विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांकडून एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी पियूष भीमराव लोखंडे (वय २८, रा. एमआयडीसी, खेड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात ‘ख्रिसमस पार्टी’ करण्याची बतावणी करुन शाळकरी मुलीचा विनयभंग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी पियूष याच्याशी २०२३ मध्ये ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. तरुणी गर्भवती राहिली. तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीसल निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×