Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

पार्किंगच्या वादातून तरूणाला मारहाण

पार्किंगच्या वादातून तरूणाला मारहाण

लुटमार करणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांची केली अटक

marathinews24.com

पुणे – मोटार पार्किंगच्या वादातून तरूणाला बेदम मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेणार्‍या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३ जूनला रात्री पावणे अकराच्या सुमारास धनकवडीतील काशिनाथ पाटील नगरात घडली होती. बबलु विवेक कोठारी (वय ३०, रा. बालाजीनगर, धनकवडी ) लोकेश विवेक कोठारी (वय २१) आणि शाम चांदेकर (वय २१ रा. धनकवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी थेरगावमध्ये राहणार्‍या तरूणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

परकीय नागरिकांची माहिती लपविणे अंगलट – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण थेरगावमधील असून, ३ जूनला रात्री पावणेअकराच्या सुमारास धनकवडीतील बालाजीनगरात आले होते. त्याठिकाणी मोटार पार्क करीत असताना टोळक्याने त्यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची चैन चोरून नेली होती. घटनेची माहिती मिळताच, सहकारनगर पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×