Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४६ लाखांची फसवणूक

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली सापडून मजुराचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मांजरी खुर्द परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी सप्टेंबर महिन्यात तरुणाशी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे चोरट्यांनी त्याला सांगितले. त्यानंतर तरुणाला शेअर बाजारातील गुंतवणूक योजनेबाबत एक उपयोजन (ॲप) सुरू करण्यास सांगितले. तरुणाने ॲप सुरू केले. सुरुवातीला तरुणाने काही रक्कम गुंतविली. चोरट्यांनी त्याला परताव्यापोटी काही रक्कम दिली. बँक खात्यात परतावा जमा झाल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर तरुणाने चोरट्यंच्या खात्यात वेळावेळी ४६ लाख ३३ हजार रुपये जमा केले.

पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.

‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने फसवणूक

घरातनू ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील एका तरुणाची ४ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकणी सायबर चोरट्यांविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदार तरुण सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यंनी तरुणाशी संपर्क साधून घरातून ऑनलाइन कामाची संधी, असे आमिष दाखविले होते. चोरट्यांनी सुरुवातीला तरुणाला एक काम दिले. या कामाचे पैसे तरुणाच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. चोरट्यांनी आणखी पैसे गुंतविल्यास परतावा चांगला मिळेल ,असे आमिष दाखवून तरुणाला जाळ्यात ओढले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर त्याला परतावा देण्यात आला नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×