Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

शासकीय योजनांचा लाभ घेत तरुणांनी उद्योजक व्हावे – हर्षवर्धन रानडे

शासकीय योजनांचा लाभ घेत तरुणांनी उद्योजक व्हावे - हर्षवर्धन रानडे

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे उद्घाटन

marathinews24.com

पुणे – तरुणाईला स्वयंरोजगार, उद्योगाच्या मोठ्या संधी आहेत. प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करीत उद्योगाच्या नवनवीन कल्पना सत्यात उतरवण्यासाठी पुढाकार घ्या. उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या योजना आहेत. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडियासारख्या उपक्रमांतून अनुदान देत उद्योग उभारण्याला चालना दिली जात आहे, त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा,” असे मत उद्योग मार्गदर्शक हर्षवर्धन रानडे यांनी व्यक्त केले.

प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – सविस्तर बातमी 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघ व प्रभाग क्रमांक ३४ च्या वतीने आयोजित उद्योजकता विकास मेळावा, क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी सामाजिक उपक्रमांच्या उद्घाटनावेळी रानडे बोलत होते. यावेळी राम माळी, सुभाष हगवणे, राजेश जाधव आणि आनंद जोशी यांना उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार यांना देण्यात आले.

प्रसंगी ‘राष्ट्रवादी’च्या महिला शहाराध्यक्षा स्वाती पोकळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, ओबीसी प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे, पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती भूमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखाताई दमिष्टे, नऱ्हे गावचे माजी सरपंच पोपट खेडेकर, खडकवासला मतदार संघाचे युवक अध्यक्ष शरद दबडे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष निलेश दमिष्टे, सचिन बेनकर, सुरेश परकड आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरेखाताई दमिष्टे म्हणाल्या, “देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त गेल्या ३० वर्षांपासून या उपक्रमांचे आयोजन केले जाते. देशात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. तसेच अलीकडे स्टार्टअप संस्कृती विकसित होत आहे. त्यामुळे समाजातील तरुणांमधील उद्योजक घडवण्यासाठी व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरुणांचा मोठा प्रतिसाद या मेळाव्याला मिळाला.”

“शिवाजीनगर येथील एव्हिएशन गॅलरी, पर्वती येथील क्रिकेट संग्रहालय येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, वडगाव आणि धायरी येथील क्रीडांगणावर क्रिकेट स्पर्धा, विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली,” असे निलेश दमिष्टे यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×