माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी केले स्वागत
marathinews24.com
पुणे – जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी गुरुवारी (दि.२८) पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले. पाटील यांनी यापूर्वी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय, पुणे तर अकोला, वाशिम, सातारा, लातूर, जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर काम केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात ३३१ पदक विजेत्यांचा होणार गौरव – सविस्तर बातमी
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे महत्वाचा दुवा मानला जातो. शासनाची ध्येयधोरणे आणि जनहिताचे कार्यक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.





















