Breking News
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ल्यूक मडग्वेचे वर्चस्व कायम; ‘मराठा हेरिटेज सर्किट’मध्ये सलग दुसरा विजय‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेचे उत्कृष्ट व्यवस्थापन; आंतरराष्ट्रीय सायकलपटूंकडून कौतुकघरफोडी करणारा चोरटा गजाआडतळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोडPune : मध्यभागातील वाहतुकीत उद्या बदल‘स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला!सह्याद्रीची शान ‘इंदू’: बजाज पुणे ग्रँड टूरचा नवा जागतिक चेहरा‘बजाज पुणे ग्रँड टूर’च्या दुसऱ्या टप्प्याचा दिमाखदार प्रारंभपुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६; पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्पर्धामार्गावरील शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे आदेश‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत तिसऱ्या टप्प्याचे २२ जानेवारी रोजी आयोजन

दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले!

दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले!

म्हाळुंग्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून चंद्रकांतदादांचे आभार

marathinews24.com

पुणे – दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले!, अशा शब्दात म्हाळुंग्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून चंद्रकांतदादांप्रति कृतज्ञता व्यक्त केली गेली. यावेळी चंद्रकांतदादांनी देखील सर्वांचे आभार मानत, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते अशी भावना व्यक्त केली.

कोथरुड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का – सविस्तर बातमी 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ व्हीटीपी ब्लेअर मधील सोसायटीच्या रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी देशात आणि राज्यात माननीय मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या विकासाकामांची माहिती देऊन, भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी सोसायटीचे रहिवासी शिरीष भावसार यांनी दादांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतल्याचे कौतुक करताना दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले! यामुळे गरीब घरातील मुलींना उच्च शिक्षण घेणे सहज सोपे झाले आहे, अशी भावना व्यक्त केली. अशा प्रतिक्रियांमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना ना. पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजप कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, भाजप नेत्या जागृती विचारे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणि सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×