Breking News
पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

गंजपेठेत भरदिवसा घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज चोरीला

बाणेरमध्ये फ्लॅटमधून ५ लाखांचा ऐवज चोरीला

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती गंजपेठेत भरदिवसा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत ५५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १६ एप्रिलला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गंजपेठेतील श्रीनिवास इमारतीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालकाच्या मृत्यूप्रकरणी डाॅक्टरांसह परिचारिकेविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गंजपेठेतील श्रीनिवास सोसायटीत राहायला असून, १६ एप्रिलला ते कुटूंबियासह बाहेर गेले होते. त्यावेळी भरदुपारी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ५५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सव्वा लाखांवर ऐवज चोरून नेला. संध्याकाही सहाच्या सुमारास तक्रारदार हे घरी आले असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×