Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक २०१७ ची संख्या कायम राहणार

पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक २०१७ ची संख्या कायम राहणार

पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक २०१७ ची संख्या कायम राहणार

marathinews24.com

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होणार आहे. त्यामुळे प्रभागरचना ‘जैसे थे’ राहणार आहे. पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक २०१७ ची संख्या कायम राहणार असून, ३२ प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या पूर्वीप्रमाणेच १२८ राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुका लक्षात घेवून मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा : राजेश पांडे – सविस्तर बातमी 

महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. मात्र करोना आणि राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा अशा विविध कारणांमुळे महापालिका निवडणूक तीन वर्षांपासून लांबणीवर पडली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता राज्य शासनाने प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. त्यानुसार ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत १७ लाख लोकसंख्येला महापालिकेत १२८ नगरसेवक आणि ३२ प्रभाग होते. तेच कायम राहणार आहे.

आतापर्यंतची प्रभाग रचना

महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. मात्र, १९८६ पर्यंत प्रशासकीय राजवट
१९८६ – पहिली निवडणूक झाली. एक सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ६० प्रभाग
१९९२ – एक सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ७८ प्रभाग
१९९७ – एक सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ७९ प्रभाग
२००२ तीन सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ३५ प्रभाग
२००७ – एक सदस्यीय प्रभाग पद्धती, नगरसेवक संख्या १०५
२०१२ – द्विसदस्यीय प्रभाग पद्धती आणि ६४ प्रभाग
२०१७ – चार सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ३२ प्रभाग
२०१७ मधील पक्षीय बलाबल
भाजप – ७७
राष्ट्रवादी कॉंग्रेस – ३६
शिवसेना – ९
मनसे – १
अपक्ष – ५

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×