Breking News
ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून गोळीबार; दोघे जखमीकेंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटनमराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

मंडई, शिवाजीनगर, कर्वेनगर परिसरात धुडगूस

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात चोरट्यांनी धुडगूस घातला असून, पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या घटना मंडई, शिवाजीनगर, कर्वेनगर परिसरात घडल्या आहेत. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी शांत झालेली चोरट्यांची टोळी पुन्हा एकदा कार्यरत झाल्याचे घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी 

खरेदीसाठी मंडईतील तुळशीबाग गणपती जवळ थांबलेल्या एका ३५ वर्षीय महिलेच्या बॅगेतून चोरट्यांनी ५२ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना ४ एप्रिलला संध्याकाळी सहाच्या सुमारास गुप्ता बॅग हाउसमध्ये घडली आहे. याप्रकरणी सोलापूरमध्ये राहणार्‍या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार सुरवसे तपास करीत आहेत.

पदपथाजवळील झाडाची फुले तोडत असलेल्या महिलेजवळ येउन दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ३४ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना ४ एप्रिलला सकाळी सहाच्या सुमारास शिवाजीनगरमधील पै क्लिनीक व रशरन्स ट्रेडर्सच्या समोर घडली आहे. याप्रकरणी यशोधन अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या ५३ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. परिसरातील सीसीटीव्हींचे फुटेज तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अमलदार पवार तपास करीत आहेत.

पादचारी जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले

दुचाकीस्वार चोरट्यांनी पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील ५० हजार रूपयांचा नेकलेस हिसकावून नेला आहे. ही घटना ४ एप्रिलला सकाळी सव्वा सातच्य सुमारास अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसह्याद्री सहकारी गृहरचना संस्था मर्यादित सोसायटी, पटवर्धन रोडजवळ घडली आहे. याप्रकरणी कर्वेनगरात राहणार्‍या ६० वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×