Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात अमली पदार्थांविषयी जनजागृती

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात अमली पदार्थांविषयी जनजागृती

१४ ऑगस्ट २०२५ रोजी अमली पदार्थांविषयी विशेष जनजागृती सत्राचे आयोजन

marathinews24.com

पुणे – भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि पुणे गुन्हे शाखा – एन.डी.पी.एस. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी दि . १४ ऑगस्ट २०२५ रोजी अमली पदार्थांविषयी विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या धोक्याविषयी, एन.डी.पी.एस. कायद्याबद्दल माहिती देणे तसेच तरुणांमधील व्यसनाधीनतेच्या धोक्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, युद्धजीत भोसले,सौ. मोहिनी भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला . या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्य (प्रशासन) डॉ. सचिन चव्हाण, उपप्राचार्य (संशोधन व मानांकन) डॉ. सुनीता जाधव तसेच विभागप्रमुख डॉ. एस. डी. जाधव उपस्थित होते.

शालेय मुलीला धीरही दिला अन दाम्पत्याच्या संसारही वाचविला – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक प्रशांत अण्णछत्रे यांनी एन.डी.पी.एस. कायद्याचे महत्त्व, त्याची अंमलबजावणी आणि अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याविरोधात चालवण्यात येणाऱ्या लढ्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी जाण्याची वाढती प्रवृत्ती लक्षात घेता जनजागृती व प्रतिबंधात्मक उपायांची तातडीची गरज त्यांनी अधोरेखित केली.कार्यक्रमादरम्यान पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रश्नोत्तर सत्र घेतले. अलीकडील घडामोडी, कायदेशीर प्रक्रिया आणि एन.डी.पी.एस. कायद्याशी संबंधित विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन त्यांनी केले.

युद्धजीत भोसले यांनी वास्तव जीवनातील उदाहरणे देत सोप्या भाषेत एन.डी.पी.एस. कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कायद्याचे , शिक्षेचे प्रकार आणि त्याचे परिणाम समजावून सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त केले.आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा मांडताना सौ. मोहिनी भोसले यांनी व्यसनाधीनतेमुळे होणारे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम उलगडून दाखवले. व्यसनाधीनतेपासून लांब राहण्यासाठी लवकर जागरूकतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×