Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

भोंदूकडून महिलेवर बलात्कार; ५० लाखांची फसवणूक

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

स्वारगेट पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नाशिकमधील अशोक खरात, तसेच पुण्यातील ऋषीकेश वैद्य प्रकरण ताजे असतानाच एका भोंदूने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले. कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवून भोंदूने महिलेवर बलात्कार केला, तसेच महिलेची ५० लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी एका भोंदूविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ओैंदुबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, गडदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातउसने पैशांवरून एकाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पतीशी पटत नव्हते. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने ती वेगळी राहत होते. महिलेची पाच वर्षांपूर्वी एकामार्फत गडदे याच्याशी ओळख झाली. तेव्हा गडदे याने देवऋषी असल्याची बतावणी महिलेकडे केली. माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी त्याने केली. कौटुंबिक समस्या दूर करतो, असे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर महिलेला त्याने जाळ्यात ओढले. त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लाॅजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर त्याने महिलेला माणगाव परिसरात बोलावून तेथील एका लाॅजवर बलात्कार केला. महिलेला नोकरी, तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आरोपी गडदेने तिच्याकडून वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. काही रक्कम रोख स्वरुपात घेतली, तसेच महिलेकडून दागिने घेतले. गेले पाच ते सहा वर्ष हा प्रकार सुरू होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून पुण्यातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई, जि. पालघर) याला अटक करण्यात आली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×