Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम पुणे येथे

marathinews24.com

पुणे –  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रधर्म वाढवुया…मराठीची गुढी उंच उभी करुया..! – सविस्तर बातमी 

हा कार्यक्रम शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, सिम्बायोसिस महाविद्यालय ऑडिटोरियम, जुना कॅम्पस, विमाननगर, पुणे – ४११०१४ येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य राहणार आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम संत परंपरेच्या स्मरणार्थ तसेच अध्यात्मिक विचारांच्या प्रसारासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमात “मोगरा फुलला” या आध्यात्मिक-सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा परिचय करून देण्यात येणार असून गणेश शिंदे (व्याख्याते, स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार) यांचे विशेष प्रबोधनपर सादरीकरण होणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

पुणे व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×