Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन; शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन

marathinews24.com

पुणे – श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे सन २०२५-२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास, धर्मासाठी दिलेले महान बलिदान तसेच समाजासाठी केलेले अमूल्य कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने नांदेड येथे ऐतिहासिक, भव्य व दिव्य “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बजाज कंपनीकडून ‘डोमिनार ४००’ मोटार सायकलीचे पोलीस दलास हस्तांतरण – सविस्तर बातमी 

नांदेड येथे असर्जन भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मा.मुख्यमंत्री महोदय विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहेत.

शैक्षणिक उपक्रम

या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा व महाविद्यालयांमध्ये खालील शैक्षणिक व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनजागृती मोहीम १५ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान प्रभातफेरीचे आयोजन. २५ जानेवारी २०२६ पर्यंत शाळांमधील परिपाठाच्यावेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्याबाबत सूचना निर्गमित,डॉक्युमेंटरी प्रदर्शन, घोषवाक्याचा प्रसार : “हिंद दी चादर- श्री गुरु तेग बहादुर”

तालुकास्तरीय स्पर्धा (१५ ते १७ जानेवारी २०२६)
चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा ई.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
दिनांक : २० जानेवारी २०२६
ठिकाण : गुरुग्रंथसाहेबजी भवन, सचखंड पब्लिक स्कूलजवळ हिंगोली गेट, नांदेड

विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी असून, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमाच्या वेळी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.

नागरिकांसाठी आवाहन

नागरिकांनी सोशल मीडियावर #hinddichadar350 या हॅशटॅगचा वापर करून कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट शेअर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासंबंधी सविस्तर माहिती gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

शिक्षणाधिकारी (प्राथमिक),
शिक्षणाधिकारी (माध्यमिक),
शिक्षणाधिकारी (योजना),
जिल्हा परिषद, नांदेड
ई-मेल : ssananded1@gmail.com
वेबसाइट : zpnanded.mahara

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×