Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे – तर आरोग्यपूर्ण विकासही’

बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे – तर आरोग्यपूर्ण विकासही’

भाजपा उमेदवार सनी विनायक निम्हण यांची ग्वाही

marathinews24.com

पुणे – बोपोडी परिसराचा विकास केवळ स्मार्टच नव्हे, तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीपर्यंत विस्तृत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीच्या उमेदवार
चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी दिली.

पुण्यातील कोंढवा, महंमदवाडी परिसरात शिवसेना प्रचाराचा जोर – सविस्तर बातमी 

बोपोडी परिसरात काढलेल्या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना बोलताना निम्हण यांनी हा आश्वास दिला. यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निम्हण म्हणाले की, बोपोडी परिसरात सुसज्ज अंतर्गत रस्ते, पदपथ, उद्याने आणि क्रीडांगणे यांसारखी स्मार्ट शहरातील आवश्यक साधने तर सुरू केली जातील, परंतु त्याचबरोबर नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा, स्वच्छ हवा, सुरक्षित आणि शुद्ध पाणी, तसेच कचऱ्याचे योग्य नियोजन यांना प्राधान्य दिले जाईल. त्यांच्या मते, आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित वातावरण हेच खरा नगर विकासाचा पाया आहे.

माझे राजकारण विभाजनाचे नाही, माझे राजकारण विश्वासाचे, विकासाचे आहे. कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांचे संस्कार माझ्यावर आहेत, यामुळे या निवडणुकी दरम्यान दिलेली सर्व आश्वासने प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी मी जबाबदार असेल. विकासाच्या कामांसाठी 100 दिवसांचा ठोस कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल आणि त्याची नियमित प्रगती नागरिकांसमोर सादर केली जाईल, असेही ते म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×