शेअर ट्रेडींगचे आमिष पडले १ कोटी ५७ लाखांना

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी मारला डल्ला 

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठाला तब्बल १ कोटी ५७ लाख २७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १७ मार्च ते २९ मे २०२५ कालावधीत वडगाव शेरीत घडली आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय जेष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जग्वार कंपनीचे प्लबींग साहित्य चोरणार्‍याला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव शेरीत राहायला असून, १७ मार्चला सायबर चोरट्याने त्यांना फोन करून शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीची माहिती दिली. काही दिवसांत चोरट्याने जेष्ठाचा विश्वास संपादित करून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अवघ्या दोन महिन्यात तब्बल १ कोटी ५७ लाख २७ हजारांची गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

फोन पे सुरू करण्याची बतावणीने ५ लाखांना गंडा

पुणे- बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून साबयर चोरट्याने जेष्ठाला फोन पे सुरू करून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून ऑनलाईनरित्या तब्बल ५ लाख ३५ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १३ ते १९ जून कालावधीत पिसोळी घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पिसोळी राहायला असून, १३ जूनला साबयर चोरट्यांनी त्यांना फोन केला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करीत जेष्ठाला फोन पे सुरू करून देउ असे चोरट्याने सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून ऑनलाईनरित्या तब्बल ५ लाख ३५ हजार रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने काळेपडळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत.

बसप्रवासात महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ महिलेला धक्का देउन त्यांच्या हातातील १ लाख १० हजार रूपये िंकमतीची सोन्याची बांगडी चोरट्यांनी काढून नेली आहे. ही घटना १४ ऑगस्टला दुपारी पावणेदोन ते तीन वाजेच्या सुमारास महानगरपालिका ते जिजाई गार्डन वारजे बसप्रवासात घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला वारजेत राहायला असून, १४ ऑगस्टला दुपारी पावणेदोन ते तीन वाजेच्या सुमारास महानगरपालिका ते जिजाई गार्डन असा प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये एका महिलेने त्यांना धक्का दिला. त्यानंतर पुन्हा त्यांना मदत करण्याचा बहाणा करीत चोरट्या महिलेने जेष्ठेच्या हातातील १ लाख १० हजारांची सोन्याची बांगडी काढून नेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एच.आर.हंस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×