पर्वती पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – हार्डवेअर दुकानातील जग्वार कंपनीचे महागडे प्लबींग साहित्य चोरणार्याला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ९२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. अक्षय शंकर कांबळे (वय २५ रा. मिरेकर वस्ती, वैदुवाडी हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १० ऑगस्टला पर्वती पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शस्त्राच्या धाकाने बुलेट विक्री दालनातील ७ लाखांची लूट – सविस्तर बातमी
पर्वती दर्शन परिसरात भाग्यलक्ष्मी हॉर्डवेअरचे दुकान असून, १० ऑगस्टला चोरट्याने दुकानातून १ लाख ७ हजारांचे प्लंबिगचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पथकाने तपासाला गती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण पवार यांनी तपासाला गती दिली. पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना मिळालेल्या माहितीन्वये हा गुन्हा अक्षय शंकर कांबळे वय २५ याने केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार त्याला हडपसर भागातुन पकडुन ९२ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, एसीपी अजय परमार,प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, अमोल दबडे, अमित चिव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, मनोज बनसोड यांनी केली.





















