Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

१२ हजार ७५० विद्यार्थ्यांना ‘अंकनाद – गणित सात्मीकरण प्रणाली’

टिळक पुण्यतिथीनिमित्त गणित प्रणाली प्रदान

marathinews24.com

पुणे – गणिताची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करणाऱ्या ‘अंकनाद – गणित सात्मीकरण प्रणाली’ ८७ शाळांमधील एकूण १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ १ ऑगस्टला भावे हायस्कूल (सदाशिव पेठ) येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पार पडला. इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन (मुंबई) यांच्या पुढाकारातून आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. (पुणे) यांच्या तांत्रिक सहकार्याने तयार झालेल्या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबा शिंदे, मॅप एपिकचे संचालक मंदार नामजोशी, पराग गाडगीळ, इंडिविश वेलफेअर फाऊंडेशनचे संचालक भूपेंद्र मुजुमदार, अतुल कुलकर्णी, संजय पांडे, शशांक टिपणीस यांच्या उपस्थितीत झाले.

राज्य शासन एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

उपक्रमात शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्यातील शाळांनी सहभाग घेतला आहे. प्रणाली अंतर्गत, शालेय स्तरावर गणितातील पाढे, अपूर्णांक, वर्ग इत्यादी संकल्पना विद्यार्थ्यांना संगीतबद्ध पद्धतीने शिकवण्यात येणार आहेत. एकूण २५५ वर्गांमध्ये प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांमागे एक अशा पद्धतीने एमपी-थ्री ( MP3) डिव्हाइस वितरित करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना गणिताशी मैत्री करता येईल आणि विषयावरील भीती दूर होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.कार्यक्रमात बोलताना बाबा शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले ‘गणिताचा पाया भक्कम झाल्याने शिक्षणाचा आणि प्रगतीचा पाया भक्कम होईल. मंदार नामजोशी म्हणाले, ‘९० टक्के विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती असते, ती दूर करणारे हे उपकरण केवळ अध्यापनाचे साधन नाही, तर एक संधी आहे विद्यार्थ्यांच्या उजव्या मेंदूला उद्दीपित करण्याची. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल’.

‘अंकनाद’ ही प्रणाली तीन टप्प्यात विभागलेली असून, पहिल्या टप्प्यात एमपी-थ्री MP3 डिव्हाइसद्वारे श्रवणसंस्कार, दुसऱ्या टप्प्यात मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने ‘पाढे सात्मीकरण स्पर्धा’ आणि तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना ‘गणीतालय’ पोर्टलचे सभासदत्व मिळणार आहे. या पोर्टलवर १२०० हून अधिक व्हिडिओ, १००० हून अधिक तज्ज्ञ मार्गदर्शक, आणि गणिताशी संबंधित वेबिनार उपलब्ध आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×