Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यात १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा लिलाव

वाहन मालकांना १५ दिवसांची मुदत

marathinews24.com

पुणे – सार्वजनिक रस्त्यावर दीर्घकाळापासून धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांवर पुणे वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. विविध भागांतून हटविण्यात आलेली तब्बल १ हजार ३१७ बेवारस वाहने हडपसर येथील रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, समर्थनगर परिसरातील वाहन डम्पिंग यार्डमध्ये जमा केली आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांच्या सुरक्षित हालचालींवरही परिणाम होत असल्याने त्यांचा जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया वाहतूक शाखेने सुरू केली असल्‍याची माहिती पोलिस उपायुक्‍त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे.

पुण्यात दोन बांगलादेशी तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका – सविस्तर बातमी

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहनांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ८५ (१) अन्वये ही कारवाई करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांची वाहने बेवारस वाहनांच्या यादीत असण्याची शक्यता आहे, त्यांनी रामटेकडी येथील वाहन डम्पिंग यार्डमध्ये जाऊन वाहनांची पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित वाहनावर आपला मालकी हक्क असल्यास, प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत संबंधित वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक किंवा सहायक पोलिस निरीक्षकांसमोर उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे.

विहित मुदतीत कोणत्याही वाहनाच्या मालकाने किंवा कायदेशीर हक्कदाराने मालकी हक्क सिद्ध केला नाही, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ८७ मधील तरतुदीनुसार संबंधित वाहने शासनाच्या स्वाधीन असल्याचे मानले जाणार आहे. त्यानंतर या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अनावश्यकपणे व्यापून ठेवणाऱ्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे या कारवाईमुळे रस्त्यांवरील अडथळे दूर होऊन वाहतुकीला अधिक मोकळीक मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×