Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

जीवनसाथीवरून झाली ओळख, लग्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा

जीवनसाथीवरून झाली ओळख, लग्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा

तरूणीची फसवणूक, पुण्यातील सहकारनगरातील घटना

marathinews24.com

पुणे – जीवनसाथी डॉट कॉमवरून झालेली ओळख एका महिलेला तब्बल २५ लाख रूपयांचा पडली आहे. संबंधित हर्ष नावाच्या व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादित करून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून नागपूरमधील बँकेत खाते उघडून ११ लाख ७५ हजार रूपये पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेच्या नावे तब्बल १३ लाख १९ हजार रूपयांचे मनपुरम गोल्ड लोन घेउन फसवणूक केली आहे.

हडपसर गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी गजाआड; प्रतिस्पर्धी टोळीतील सराइताचा पाठलाग करुन खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

ही घटना एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ कालावधीत पुण्यातील सहकारनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी सारिका झाडे (वय ४४, रा. पद्मावती, सहकारनगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार हर्ष भार्गव विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सारिका सहकारनगरमध्ये राहायला असून, एप्रिल २०२४ मध्ये जीवनसाथी डॉट कॉम विवाह नोंदणी स्थळावरून त्यांची हर्ष भार्गव सोबत ओळख झाली होती. काही दिवस चॅटिंग केल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाल्यामुळे हर्षने सारिकाला लग्नाचे आमिष दाखवले. तिला शेअर मार्वेâट शिकवतो असे सांगून, त्याने सारिकाच्या नावे नागपूरमधील धर्मपेठ परिसरात डेव्हपमेंट बँक ऑफ सिंगापूर बँकेचे खाते उघडले. संबंधित बँक खात्याला आरोपी हर्षने स्वतःचा मोबाइल लिंक केला. त्यानंतर त्याने सारिकाकडून विविध कारणांसाठी ११ लाख ७५ हजार रूपये पाठविण्यास भाग पाडले.

त्यानंतर तिच्या नावाने १३ लाख १९ हजारांचे मणपुरम गोल्ड लोण घेतले. आरोपीने काही दिवसांनी सारिकासोबत संपर्क बंद केला. घेतलेली रक्कम आणि गोल्ड लोण परत केले नाही. सारिकासोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.डी. फकीर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×