Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

Hadapsar Crime News : हडपसर गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी गजाआड

Hadapsar Crime News :

प्रतिस्पर्धी टोळीतील सराइताचा पाठलाग करुन खुनाचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे –  Hadapsar Crime News : वैमनस्यातून तरुणाचा पाठलाग करुन देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी गजाआड केले. आरोपींनी केलेल्या गोळीबारात नेम चुकल्याने त्यांच्यात गटातील साथीदार जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.

घरफोडी करणारे तीन अल्पवयीन ताब्यात, ४ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी 

याप्रकरणी सुमीत उर्फ विलास दत्ता खवळे (वय २०, रा. सातववाडी, सासवड रस्ता, हडपसर), साहिल बाबुराव जगताप (वय २०, रा. जाई मंगल कार्यालयासमोर, मांजरी, हडपसर), बसवराज विजय सुतार (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा), वैभव श्रावण गवळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा), सचिन गंगाराम रेनके (वय ३५, रा. इंदिरानगर, शिरुर) यांना अटक केली.

मांजरी भागात वैमनस्यातून एका तरुणाचा पाठलाग करुन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना २९ मे रोजी घडली होती. आरोपी खवळे याने प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणावर पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र, त्या वेळी त्याचा नेम चुकल्याने खवळेचा साथीदार वैभव गवळी जखमी झाला होता. आरोपींनी गोळीबार करुन दहशत माजविल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
जखमी झालेल्या ग‌वळीवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याच्याबरोबर असलेले साथीदार खवळे, जगताप, सुतार यांना पकडण्यात आले. Hadapsar Crime News

पोलीस तपासात आरोपींनी गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल शिरुरमधील सचिन रेनके याच्याकडून घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी रेनके याला ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, दीपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×