Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात विवाहितेचा छळ प्रकरणात ३ गुन्हे दाखल

पुण्यात ऐन दिवाळीत दुचाकीस्वार चोरटे सुसाट

छळ केल्याप्रकरणी पती, सासूसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाहितेचा शारिरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांकडून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छळ प्रकरणात सासरकडील नातेवाईकांविरुद्ध हडपसर, लोणी काळभोर, फुरसुंगी पाेलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी

हडपसर भागात एका महिलेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासूसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती रामदास धनशीर, सासू सुंदराबाई, दीर लक्ष्मण, उर्मिला कांबळे (सर्व रा. बिदर, कर्नाटक) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेचा सासू, पतीकडून छळ करण्यात आल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार शिंगाडे तपास करत आहेत.

चारित्र्याचा संशय घेऊन महिलेचा छळ केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पती राम जरिचंद तगारे, सासू,सुनीता, दीर राहुल, नणंद माधुरी संदीप पवार, संदीप पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार गुरव तपास करत आहेत.

माहेरहून महागडी मोटार घेऊन ये, अशी मागणी करुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी लोणी काळभाेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती सौरभ सुनील सातव, सासू सविता, सासरे सुनील (रा. उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता), नणंद साक्षी प्रतीक बोराटे, पतीची मैत्रीण अपुर्वा रमेश कड, मावशी विद्या भुमकर, अतिश भुमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिलेचा पाच महिन्यांपूर्वी सौरभ सातव याच्याशी विवाह झाला होता. विवाहात हुंडा कमी दिला. माहेरहून महागडी मोटार घेऊन ये, अशी मागणी करुन आरोपींनी छळ केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक बाेबडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×