घरफोडी करणार्‍या ३ अल्पवयीनांना घेतले ताब्यात

पावणेचार लाखांचा ऐवज जप्त, हडपसर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरासह ग्रामीण भागात घरफोडी करणार्‍या तिघा अल्पवयीनांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३ गुन्हे उघडकीस आणून, ३ लाख ८५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये पावणेदोन लाखांचे दागिने, दोन लॅपटॉप, दुचाकीचा समावेश आहे. अल्पवयीनांनी हडपसरमध्ये दोन आणि जेजुरीत एक घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे.

पादचारी जेष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार केले. तपास दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढला. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी तीन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मागील दोन महिन्यांत घरफोडी केल्याची कबुली दिली.

अल्पवयीन आरोपींनी आणखी कोठे चोरी केली आहे का, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, अमित साखरे, महेश चव्हाण, सागर कुंभार यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×