Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

वाघोली पोलीस ठाण्यातील ३ पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित

तरुण- तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देऊन १० हजार उकळले

marathinews24.com

पुणे – आयटी अभियंता आयटी अभियंता तरुण-तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन पोलिसांनी त्यांच्याकडून फोन पे-द्वारे पैसे उकळल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. हा प्रकार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर पडताच, त्यांनी तत्काळ वाघोली पोलिस ठाण्यातील तिघा पोलिसांचे निलंबन केले आहे. पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे, किरण कांबळे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश पारित केला आहे.

पुणे आरटीओकडून १ हजार ९२२ कोटी रुपये वसूल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलदार अब्दागिरे, खाडे आणि कांबळे हे वाघोली पोलीस ठाण्यात नेमणूकीस होते. २ एप्रिलला खाडे आणि कांबळे हे दोघे वाघोली गावठाण बिट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास त्यांना नियंत्रण कक्षाकडून कॉल मिळाला. वाघोलीतील सोसायटीत काही मुले रुमवर मुली आणून व्हिडीओ तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अंमलदार खाडे आणि कांबळे हे त्या सोसायटीत पोहचले. तेथील २४ वर्षीय तरुणाला घेऊन हे दोघे पोलिस ठाण्यात गेले. त्या रात्री ठाणे अंमलदार म्हणून अब्दागिरे हे कर्तव्यावर होते. कॉलच्या अनुषंगाने जर असा काही प्रकार होता तर, योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र या तिघांनी अशी कोणतीच कार्यवाही केली नाही. उलट अंमलदार अब्दागिरेने तरुण तरुणीला तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सेक्स रॅकेटमध्ये अडकवितो, नोकरी घालवितो, नातेवाईकांना बोलावून घेतो अशा धमक्या दिल्या.

अंमलदार खाडेने तरुणाला हाताने चापटा मारल्या. कांबळेने तरुणाच्या मैत्रीणीला पोलीस ठाण्यात ताटकळत उभे ठेवले. हा प्रकार मिटवून घेण्यासाठी पोलिसांनी मिळून तरुणाकडे १० हजार रुपयांची मागणी केली. खाडेने त्याच्या मोबाईलमध्ये असेलेला स्कॅनर तरुणाला दाखविला. तो ओंकार ॲटो गॅरेज नावाने होते. त्यावर फोन पे-द्वारे १० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतले. पोलिसांच्या वर्तनाबद्दल तक्रारदार तरुणाला संशय आला होता. तिघा पोलिसांनी पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला होता. त्यानंतर दोघा आयटी अभियंता तरुण-तरुणीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे धाव घेत तक्रार केली. प्राथमिक चौकशीत तिघा पोलिसांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×