Breking News
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्तीनॉर्वे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टमंडळात ‘ग्रीनएक्स’च्या आरती भोसले-अहिवळे यांची निवडआरएमसी दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी बीएआय-आरएमसी यांच्यात संयुक्त बैठकपुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्नमुंढव्यातील तो खून नव्‍हे अपघातबनावट सोने तारण ठेवून बँकेची ४ कोटींची फसवणूककाेथरूड भागात तरुणावर शस्त्राने वारमतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न‘एपीके’ फाईल पाठवून ५० हजारांची फसवणूकनीट २०२६ पेपरफुटी प्रकरणी पुण्यात संताप; छावा संघटनेचे आंदोलन

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक

 ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाची ३३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ४३ वर्षीय व्यावसायिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात सुरक्षा रक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी तक्रारदार व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांना एक काम दिले. ऑनलाइन पद्धतीने हे काम पूर्ण केल्यानंतर खात्यात पैसे जमा झाल्याचे भासविले. त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, तसेच मूळ रक्कमही परत देण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी २७ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५५ वर्षीय व्यावसायिक हे रविवार पेठेत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता, तसेच त्यांना गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. व्यावसायिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, त्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×