Breking News
Savitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हे

लष्कराच्या एआयपीटीमधून ५ ट्रॉफी, दोन ब्रॉंझ सिल्व्हर ट्रॉफींची चोरी

Pune Crime News

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील वानवडी परिसरातील लष्कराच्या एआयपीटीच्या गेस्ट हाऊसमधून शोकेशमध्ये ठेवण्यात आलेल्या ५ सिल्व्हर ट्रॉफी व दोन ब्रॉंझ सिल्व्हर ट्रॉफी अज्ञाताने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ट्रॉफींची किंमत सव्वा आठ लाख रुपये असल्याचे पुणे पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार १३ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत घडला आहे.

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे लष्करातील हवालदार आहेत. वानवडी परिसरात लष्कराचे एआयपीटीचे गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये लष्कराला मिळालेल्या वेगवेगळ्या कार्याच्या पाच सिल्व्हर ट्रॉफी व दोन ब्रॉंझ सिल्व्हर ट्रॉफी येथील शोकेशमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, जवळपास एक महिन्यांच्या कालावधीत अज्ञाताने या गेस्ट हाऊसमध्ये घुसून या सर्व ट्रॉफी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. ट्रॉफींची किंमत जवळपास ८ लाख ३९ हजार रुपयांची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर लष्करांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक महाडिक हे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×