Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने ६२ लाखांची फसवणूक

ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने ६२ लाखांची फसवणूक

सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एकाची ६२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश सुधाकर सोवळे (वय ४०, रा. साईशिल्प बिल्डिंग, साईनगरी, चंदननगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारक, विविध बँक खातेधारक तसेच लिंकद्वारे व्यवहार करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा नोंदविला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.

बँकेतील आरटीजीएस फॉर्म चोरून फेरफार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. २८ डिसेंबर २०२५ ते ३ फेब्रुवारी २०२६ कालावधीत विश्वास संपादन करत तक्रारदाराला विविध लिंक पाठवल्या. वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास प्रवृत्त केले. तक्रारदाराने त्यांच्या सांगण्यावरून टप्प्याटप्प्याने ६२ लाख ९० हजार रुपये भरले. मात्र त्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×