Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

नशेच्या ६ हजार ९०० गोळ्या जप्त; दोघांना अटक

नशेच्या ६ हजार ९०० गोळ्या जप्त; दोघांना अटक

खडक पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ६ हजार ९०० गुंगीकारक औषधी गोळ्या खडक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या गोळ्या उत्तर प्रदेश येथून कुरिअरद्वारे मागवून पुणे शहरातील विविध परिसरात विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनसाखळ्या हिसकावणारा सराईत जेरबंद = सविस्तर बातमी 

समीर हमीद शेख (वय ४०, रा. साईनगर, कोंढवा) आणि सुनील गजानन शर्मा (वय ३४, रा. सुखसागरनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी दोघेजण स्वारगेट परिसरात येणार असल्याची माहिती खडक पोलिस ठाण्याचे कर्मचारी आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार २५ नोव्हेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना अडवले. त्यांची झडती घेतली असता ते गुंगीच्या औषधाची विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये तसेच कोंढवा येथील राहत्या घरात नायट्राझेपॅम टॅब्लेट आयपी नित्झास्केन -१०, अल्प्राझोलम टॅब्लेट आय.पी ०.५ मिग्रॅ, अल्प्राझेन -०.५, नायट्राझेपॅम टॅब्लेट आयपी नित्झास्केन -१० या अंमली पदार्थाच्या एकूण ६ हजार ९०० गोळ्या मिळून आल्या आहेत.

आरोपींकडून पोलिसांनी अंमली पदार्थाच्या गोळ्या आणि दुचाकी असा दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अंमली पदार्थ असलेल्या औषधी गोळ्या विनापरवाना व डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनशिवाय नशेसाठी खरेदी-विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणाहून औषधसाठा मागवत असल्याचे व कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा परीसरात नशेसाठी गोळ्यांची विक्री करत असल्याचे दिसून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे करत आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्यासह पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×