Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

सोनसाखळ्या हिसकावणारा सराईत जेरबंद

सोनसाखळ्या हिसकावणारा सराईत जेरबंद

५ गुन्हे उघडकीस, आंबेगाव पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागातील नागरिकांच्या सोन साखळ्यासह इतर किंमती ऐवज हिसकावणार्‍या सराईताला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणून, ऐवज, दुचाकी असा ३ लाख ९२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आकाश नरहरी शिंदे (रा. जाधवनगर, वडगाव बुद्रूक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सराफी पेढीतून सोन्यची अंगठी लांबविणारा अटकेत – सविस्तर बातमी 

गुजरवाडी परिसरात चोरट्याने दुचाकीस्वाराचा मोबाइल आणि गाडी असा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची घटना २ मे रोजी घडली होती. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अंगलदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे हे शोध घेत होते. त्यावेळी संबंधित गुन्हा सराईत आरोपी आकाश शिंदेने केल्याची माहिती मिळाली. तो दरी पुलाच्या जवळ येणार असल्याची मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस उप निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपी शिंदेला ताब्यात घेतले.

सराईत शिंदेने आंबेगाव, सिंहगड, बावधन पोलीस ठाण्यातंर्गत हद्दीत जबरी चोरी केल्याचे उघडकीस आले. तसेच तो खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पाहिजे आरोपी होता. त्याला अटक करून किंमती ऐवज, दुचाकी असा ३ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, सुभाष मोरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, प्रमोद भोसले, राकेश टेकवडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×