Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात वाहनांची तोडफोड, तब्बल १७ वाहने फोडणाऱ्या टोळीला अटक

गुन्हे शाखेच्या युनीट ५ ची उत्तम कामगिरी

Marathinews24.com

पुणे – नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड करणार्‍या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अटक केली आहे. टोळक्याने कोंढवा बुद्रूकमधील ९ वाहनांची तोडफोड करीत नुकसान केल्याची घटना १६ एप्रिलला पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यासोबत टोळक्याने दुसऱ्या ठिकाणीही वाहनाची तोडफोड करीत १७ हुन वाहने फोडली होती. याप्रकरणी नवाज अजीज शेख (वय २०) अल्फाज मुर्तजा बागवान (वय २० ) यश विजय सारडा (वय १९) अमन कबीर इनामदार (वय २० सर्व रा. इंदिरानगर पॉवर हाऊसचे मागे, गुलटेकडी पुणे) यांना अटक केली आहे.

पुण्यातील नामांकित व्यापाराच्या घरातून ८ तोळे सोने गायब

दुचाकीस्वार टोळक्याने १६ एप्रिलला पहाटेच्या सुमारास अश्रफनगर कोंढवा परिसरात दहशत माजवून ९ चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. त्याच टोळक्याने लक्ष्मीनगरमध्येही दुचाकी, रिक्षा, मोटारीची तोडफोड करुन दहशत माजवली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडूनही आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार युनीट पाचचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार राजस शेख आणि पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना आरोपींची माहिती मिळाली.

आरोपी नवाज शेख, अल्फाज बागवान, यश सारडा व अमन इनामदार यांनी साथीदारांसोबत वाहनांची तोडफोड केली असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी डायस प्लॉट गुलटेकडी येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेत अटक केली. चौकशीत त्यांनी साथिदारांसह वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, अकबर शेख, उमाकांत स्वामी, संजयकुमार दळवी, सुहास तांबेकर, पल्लवी मोरे, स्वाती तुपे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×