Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

‘मंचर येथे आयोजित महाराजस्व अभियाना’ अंतर्गत समाधान शिबीरात ८१६ लाभार्थ्यांना थेट लाभ

महसूल, आरोग्य, कृषी, पंचायत समिती व इतर विभागांच्या समन्वयातून एकाच छताखाली ८१६ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, जिल्हा प्रशासन आणि आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, (२७ जुलै) रोजी शिवगिरी मंगल कार्यालय, मचर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत विधानसभा मतदारसघस्तरीय भव्य ‘समाधान शिबीर पार पडले.

शोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडते; अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांचे उद्गार – सविस्तर बातमी

या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी आबेगाव व शिरूरचे उपविभागीय अधिकारी, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, खेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी , तालुका कृषी अधिकारी, तालुका बालविकास अधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी याची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जलद गतीने आणि एकाच छताखाली पोहोचावा, हा या समाधान शिबीराचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासनाने तत्परतेने सोडवून त्याना शासकीय सेवाचा थेट लाभ द्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

मागील कार्यक्रमामध्ये आंबेगाव तालुक्यातील ९,७१८ आणि शिरूर तालुक्यातील ५,१५० नागरिकाना विविध शासकीय योजनाचा लाभ मिळाला होता. याच साखळीत आज पार पडलेल्या शिबीरामध्ये दोन्ही तालुक्यांतील एकूण ८१६ लाभार्थ्यांना थेट सेवा व दाखल्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये आबेगाव पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल, बचत गट, शिक्षण, रोजगार हमी व पशूसंवर्धन विभागातील २७१ लाभार्थी, तर शिरूर पंचायत समितीमार्फत ७५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. याशिवाय आरोग्य विभागामार्फत १८२, संजय गांधी निराधार योजना, महसूल व निवडणूक शाखेतून १२५, कृषी विभागाकडून ५६, महा ई-सेवा केंद्राद्वारे ३९, महिला व बालविकास विभागातर्गत २८, प्रकल्प अधिकारी घोडेगाव (आदिवासी विकास) १५, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ८, भूमी अभिलेख ३ आणि इतर ११ अशा विविध सेवांचा समावेश असून सर्व स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकाच्या समस्यांचे एकाच छताखाली निवारण करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×