Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

वेळेत आणि पारदर्शकतेने कामे पूर्ण करा- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर मध्ये विविध विकास कामाबद्दल आढावा बैठक संपन्न

marathinews24.com

पुणे – राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, बांधकाम विभाग, पंचायत समिती इंदापूर, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी भरणे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा दर्जा, प्रलंबित मुद्दे, निधीची स्थिती आणि पुढील कार्ययोजना याविषयी माहिती जाणून घेतली.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाचा घेतला आढावा; सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या जलद कामाच्या सूचना – सविस्तर बातमी

कामांच्या गुणवत्तेवर भर देऊन विकासकामे वेळेत आणि पारदर्शकतेने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर कामे जलदगतीने करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच, इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली समन्वयाने पुढे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, विविध विभागांचे उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंते तसेच पंचायत समिती, आरोग्य विभाग व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×