Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिन साजरा करण्यासाठी आढावा बैठक

हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिन साजरा करण्यासाठी आढावा बैठक

 २५ सप्टेंबर रोजी स्मृतिदिन साजरा करण्यात येणार असून याबाबाबत नियोजन आढावा बैठक आयोजित

marathinews24.com

पुणे – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्यावतीने हुतात्मा नाग्या कातकरी यांचा स्मृतिदिन २५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार असून याबाबाबत नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली. नाग्या कातकरी हे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढलेले एक आदिवासी क्रांतिकारक होते. ते मूळचे कोकणातील पेण तालुक्यातील होते. त्यांनी ब्रिटिशांच्या वन कायद्यांविरोधात आवाज उठवला होता.

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – सविस्तर बातमी 

ब्रिटिशांनी वनसंपत्तीवर निर्बंध लादल्याने आदिवासी समाजाची उपजीविका धोक्यात आल्यामुळे त्यांनी या अन्यायाविरोधात संघर्ष केला आणि आपल्या समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. ब्रिटिशांशी झालेल्या संघर्षात २५ सप्टेंबर १९३० रोजी ते शहीद झाले. त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी त्यांचा स्मृतिदिन घोडेगाव येथे साजरा केला जातो. बैठकीत घोडेगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व कातकरी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×