Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

गुंड सोमनाथ गायकवाड टोळीही आंदेकर टोळीच्या रडारवर

गुंड सोमनाथ गायकवाड टोळीही आंदेकर टोळीच्या रडारवर

दोन आरोपींच्या पोलिस कोठडीत २२ सप्टेंबरपर्यंत वाढ

marathinews24.com

पुणे – माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनातील आरोपी गणेच कोमकर याचा आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून खून करण्यात आला. याप्रकरणी अटकेत असलेले आंदेकर टोळीतील साथीदारही रडारवर प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड टोळीतील सदस्यही असल्याचे उघडकीस आले असून, त्याअनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती गोळा करत असून, कृष्णा आंदेकरसह अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, विशेष मोक्का’ न्यायालयाने प्रकरणातील अटक आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे यांच्या पोलिस कोठडीत २२ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.

मुलींसह महिलांचे अपहरण करणार्‍या टोळीच्या म्होरक्याला बेड्या – सविस्तर बातमी 

आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर याच्यावर गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह तेरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. भवानी पेठ) हिने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.

प्रकरणात आयुषवर गोळ्या झाडल्याचा आरोप असलेला यश सिद्धेश्वर पाटील (वय १९) आणि घटनास्थळी हजर असलेल्या अमित प्रकाश पाटोळे (वय १९, दोघे रा. डोके तालीम पाठीमागे, नाना पेठ) यांची पोलिस कोठडी मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात दोघा आरोपींना हजर केले. तपास अधिकारी निरीक्षक चेतन मोरे आणि विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी गुन्ह्याच्या तपासातील प्रगती न्यायालयात सादर केली. आरोपींनी खुनाचा कट कुठे रचला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, गुन्ह्यामागचा मुख्य उद्देश काय होता, अन्य आरोपींचा ठावठिकाणा कुठे आहे, याबाबत आरोपींची चौकशी करायची असून, अन्य अटक आरोपींनी दिलेल्या माहितीची खातरजमा करायची आहे.

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल व गोळ्या कोणी दिल्या, याचा शोध घेऊन शस्त्र व वाहने जप्त करायची आहेत. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी केलेल्या कॉल्सचे विश्लेषण करायचे आहे. त्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. आरोपींच्या वतीने अॅड. मिथुन चव्हाण, अॅड. प्रशांत पवार व अॅड. मनोज माने यांनी बाजू मांडली. आरोपींना पुरेशी पोलिस कोठडी दिली असून, त्यांनी चौकशीत सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत दहा दिवसांची वाढ केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×