Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पाकिस्तानी गायकाला आमंत्रित केल्याचा आरोप, पबजवळ शिवसैनिकांचे आंदोलन

पोलीस चौकशीत गायक नेदरलँडचा नागरीक

marathinews24.com

पुणे – पाकिस्तानी गायकाला आमंत्रित केल्याचा आरोप करून शिवसैनिकांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) रविवारी रात्री कल्याणीनगरमधील एका पबसमोर आंदोलन केले. प्रत्यक्षात हा गायक नेदरलँडचा नागरिक असल्याचे स्पष्ट झाल्यावर आंदोलन आवरते घ्यावे लागले. पबमध्ये रविवारी सायंकाळी इम्रान नासीर खान याच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास शिवसैनिक तेथे जमले. गायक पाकिस्तानी असल्याचा दावा करून शिवसैनिकांनी पबमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पबमधील सुरक्षा रक्षकांशी (बाऊंन्सर) वादावादी झाली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली.

पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी – सविस्तर बातमी

इम्रान खान हा गायक प्रत्यक्षात नेदरलँडचा रहिवासी असल्याची वस्तुस्थिती त्यांनी आंदोलकांना समजावून सांगितली. त्यानंतर कार्यकर्त्यांना आंदोलन तात्पुरते स्थगित करावे लागले. आंदोलनकर्त्याना पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यात आणले. तेथे आयोजकांना बोलावून घेण्यात आले. आयोजकांनी संगीत रजनीच्या माहिती यावेळी सादर केली.कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून १४ आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×