Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून ३ लाखांचा ऐवज लांबविला

वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी, एक लाखांचा ऐवज चोरीला

खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना खराडी भागात एका सोसायटीत घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याच्या बतावणीने ४ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खराडीतील साई सदन सोसायटीत राहायला आहेत. रविवारी (१४ सप्टेंबर) तक्रारदार आणि कुटुंबीय हे सदनिका बंद करुन सकाळी सातच्या सुमारास बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी तीन लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. रात्री नऊच्या सुमारास तक्रारदार कुटुंबीयांसोबत घरी आले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी कपाटातून दागिने चोरल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×