Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गांधी भवनचा रौप्यमहोत्सव सांगता समारंभ २० सप्टेंबरला

गांधी भवनचा रौप्यमहोत्सव सांगता समारंभ २० सप्टेंबरला

सामाजिक उपक्रमांत सहकार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा होणार गौरव

marathinews24.com

पुणे – सामाजिक बांधिलकीतून समाजातील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनचा रौप्य महोत्सव सांगता समारंभ शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने ‌‘ज्याचा त्याचा विठ्ठल‌’ हा संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रम कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. कार्यक्रम सायंकाळी साडे चार वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला असून सहकार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूजक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष रोटेरियन शेखर मेहता तसेच ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या अध्यक्षा आश्विनी शिलेदार, सचिव श्यामल मराठे आणि गणेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गावकीने पुढाकार घेऊ मुक्त केले पाणंद रस्ते – सविस्तर बातमी  

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन सामाजिक उपक्रम राबवित आहे. रोटरी क्लब सभासद आणि रोटरी फाऊंडेशनने दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीतून अनेक सामाजिक उपक्रम उभे राहिले आहेत. सासवडला छोटा बंधारा बांधून पाण्याची वर्षभराची तरतूद करण्यात आली आहे. अवयव दान मोहीम राबवून गिनीज बुकमध्ये नोंद होण्याइतकी जागृती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या टेक्निकल स्कूलसाठी इमारत बांधून ज्ञान प्रबोधिनी या संस्थेकडे सुपूर्त करण्यात आली आहे. सामाजिक जाणीव ठेवून सेवा देणाऱ्या फॅमिली डॉक्टरांचा आणि निरपेक्षपणे काम करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त, सहायक आयुक्त, निरीक्षक, हवालदार यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी ज्येष्ठ व्यावसायिक तज्ज्ञ मिनोचर पटेल यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रस्ता सुरक्षा, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, अंधशाळा, जीवनज्योत, प्रसन्न ऑटिझम या सारख्या संस्थांना रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला आहे. कर्वेनगरमधील एक शाळा दत्तक घेण्यात आली असून सेवासदन संस्थेतील बी.एड.च्या विद्यार्थिनींसाठी तज्ज्ञांची व्याख्यानमाला आयोजित केली जाते. वयात येणाऱ्या युवतींसाठी ‌‘कळी उमलताना‌’ अशा वेगळ्या विषयावरील व्याख्यानांसह पंचवीस शाळांमध्ये इंटरनेट, गुगल, युट्यूब, एआयचा वापर करतानाचे धोके अशा विविध विषयांवर व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचार या विषयावर अनेक परिसंवाद आयोजित करून अनेकांचे संसार पुन्हा उभे केले आहेत.

पीडित स्त्रियांना न्यायालयामार्फत व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंसिद्धा हा उपक्रम राबविण्यात आला. खेडेगावातील बोअरवेल्सचे पुनर्भरण, जिल्हा परिषद शाळेत संगणक वर्ग तयार करून देणे, मुलींसाठी स्वतंत्र वॉशरुम बांधून देणे अशी कामेही करण्यात आली आहेत. अनेक रुग्णालयांना डायलिसीस मशीन्स, व्हेन्टीलेटर अशी वैद्यकीय उपकरणे भेट दिल्याने गरीब रुग्णांना स्वस्तात वैद्यकीय सेवा मिळू लागल्या आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या वाटचालीत अनेक संस्था, नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. अशा व्यक्तींचा व संस्थांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभानिमित्ताने ‌‘ज्याचा त्याचा विठ्ठल‌’ हा संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात मधुराणी गोखले, अमित वझे, गजानन परांजपे, अंजली मराठे, पार्थ उमराणी, शौनक कुलकर्णी, स्वप्नील भावे, केतन पवार, ओंकार जोशी यांच्या भूमिका आहेत. लेखन डॉ. समीर कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन अमित वझे यांचे आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×