Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार लाईमलाईट प्रादेशिक’ पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार लाईमलाईट प्रादेशिक' पुस्तकाचे प्रकाशन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते ‘लाईमलाईट प्रादेशिक’ या पुस्तकाचे प्रकाशन

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक सिनेमांची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘लाईमलाईट प्रादेशिक’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते शनिवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजता लजपतराय भवन संकुल, विद्यार्थी सहायक समिती, सेनापती बापट रस्ता पुणे येथे होणार आहे.

कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती; १०० वर्षांपूर्वीच्या महाकुंभाचे वैभव – सविस्तर बातमी 

रुद्र पब्लिशिंग हाऊस प्रकाशित अच्युत गोडबोले व सतीश कुलकर्णी लिखित या पुस्तकामध्ये प्रादेशिक भाषांची जादू, अविस्मरणीय चित्रपटांची गाथा उलगडण्यात आली आहे. रुद्र पब्लिशिंग हाऊस आणि पुस्तकविश्व या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे संयोजक नवनाथ जगताप यांनी कळवले आहे. पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी यांनी या पुस्तकाविषयी भरभरून अभिप्राय दिला आहे. मराठीसह बंगाली, कन्नड, तेलगू, गुजराती, मैथिली अशा प्रादेशिक भाषांमधील सिनेमांचा रसास्वाद अतिशय रंजकपणे मांडला आहे. चित्रपटांची आवड असलेल्या रसिक-प्रेक्षकांना उत्तम, रंजक प्रादेशिक चित्रपटांची कथानके आणि दिग्दर्शनातील कंगोरे, अभिनयाची वैशिष्ट्ये याची ‘क्लासिक मुशाफिरी’ घडवणारे हे पुस्तक आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×