दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, तरुणावर वार करणाऱ्या आरोपींना अटक

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, तरुणावर वार करणाऱ्या आरोपींना अटक

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरूणाला बेदम मारहाण करीत त्यांच्यावर वार करणार्‍या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ९ सप्टेंबरला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरात घडली होती. महेश अंबादासजी फोटजावरे (वय १९ रा. पुणे स्टेशन) आणि प्रसाद दत्तु कांबळे (वय २७ रा. पुणे स्टेशन, दोघेही फिरस्ते) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बेदरकारपणा आला जीवाशी, दुचाकी घसरून अल्पवयीन ठार – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे ९ सप्टेंबरला पहाटेसाडे वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवरील फ्लॅटफॉर्मवर थांबले होते. त्यावेळी तिघांजणांनी त्यांना दारु पिण्यासाठी पैसे मागतिले. त्यावेळी तक्रारदाराने त्यांना नकार दिल्याचा राग संबंधितांना आला. त्यामुळे त्यांनी तरूणाला शिवीगाळ व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या पोटावर व हातावर वार जखमी केले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेउन तरूणाने जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी तपास पथकाला मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

तपास पथकातील पोलीस कर्मचार्‍यांना दोघा आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार १६ सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास पथकाने फोटजावरे आणि कांबळेला ताब्यात घेतले. आरोपींना पुणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक निलकंठ जगताप, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदिप शितोळे, सारस साळवी, महेश जाधव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×