Breking News
प्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापर

माँसाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा संतापजनक प्रकार

माँसाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा संतापजनक प्रकार

दोषींवर कठोर कारवाई होणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

मुंबई – प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी पार्क परिसरात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र निषेध नोंदवत संताप व्यक्त केला आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये नितांत आदर आणि श्रद्धा आहे. अशा वेळेस पुतळ्याची विटंबना करणारा हा समाजकंटक विकृत आणि असमंजस प्रवृत्तीचा आहे. अशा कृत्याला कोणत्याही प्रकारे समर्थन देता येणार नाही,असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या एक्सद्वारे शुभेच्छा – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी संपर्क साधला असून पोलिसांनी तातडीने तीन पथके स्थापन करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९८ अंतर्गत गुन्हा दाखल करून दोषींपर्यंत लवकर पोहोचले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. माँसाहेबांनी शिकवलेल्या मूल्यांचा आदर राखून आपण या विकृतांच्या हातात नेतृत्वाची सूत्रे जाऊ देऊ नयेत,” असेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×