तब्बल ५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक

तब्बल ५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक

युनीट दोनने नाशिकमधून केले जेरबंद

marathinews24.com

पुणे – शहरातील कोरेगाव पार्कमध्ये कार्यालयातील घरफोडीत पसार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध तब्बल ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. रामनिवास मंजू गुप्ता (वय ३७ रा. महू मध्यप्रदेश, विठठलवाडी ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ३ जुलै २०२५ रोजी त्याने पृथ्वी एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे कार्यालय फोडले होते.

पुण्यात नवरात्रोत्सवात सराइतांवर कारवाई; एकाचवेळी ४३ सराइतांची कारागृहात रवानगी – सविस्तर बातमी 

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पृथ्वी एक्सचेंज इंडीया लिमिटेड कार्यालयात ३ जुलैला चोरी झाली होती. संबंधित ठिकाणीच्या चान्सपिंन्ट वस्न अंगुलीमुद्रा विभागाला आरोपी रामनिवास मंजू गुप्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनीट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यात येत होता. पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांना संबंधित आरोपी नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली.

आरोपी सराईत असल्यामुळे पथकाने विशेष खबरदारी घेत नाशिक गाठले. त्याठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून सराईत रामनिवास गुप्ता याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कोरेगाव पार्क व येरवडा हद्दीत घरफोडी केल्याचे दोन गुन्हे कबुल केले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, एपीआय अमोल रसाळ, अंमलदार ओम कुंभार, आबनावे, सोनम नेवसे, शिंदे, भिलारे, चव्हाण, सरडे, ताम्हाणे, जाधव, मोकाशी, पवार, टकले, निखील जाधव, संजय आबनावे, विनायक वगारे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×