Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

कात्रज बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय, गुन्हा दाखल

मसाज पार्लर चालक महिलांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी मसाज पार्लर चालक महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. लिना उर्फ सोफिया डिसूजा, विभा कल्याणकर अशी गुन्हा दाखल केलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलीस फौजदार बापू खुटवड यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने ८९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा रस्त्यावरील धनकवडी भागात एका इमारतीत हॅप्पी स्पा मसार्ज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. याबाबतची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावला. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून डिसूजा आणि कल्याणकर यांना ताब्यात घेतले. मसाज पार्लरमधील तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी महिलांनी त्यांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.

शहरात मसाज पार्लरच्या नावाखालीा वेश्या व्यवसायाचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले. दोन दिवसांपूर्वी मार्केटयार्ड भागातील मसाज पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी महिलेला अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी मसाज पार्लरमधील तरुणींची सुटका केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×