Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने ८९ लाखांची फसवणूक

पर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ८९ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सनदी लेखापालासह तिघांना पर्वती पोलिसांनी अटक केली. सनदी लेखापाल सिद्धार्थ जयराम गावडे (वय ३८,रा. आंबेगाव), विकास दामोदर खुडे (वय ४३, रा. भारती विद्यापीठ परिसर, कात्रज), पंढरीनाथ बाळासाहेब साबळे (वय ४४, रा. नऱ्हे, सिंहगड रस्ता) यांना अटक केली आहे. महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका व्यावसायिक तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुख्यमंत्री आणि म्हाडाचा लोकमान्यनगरच्या विकासाबाबत दुटप्पीपणाचा आरोप – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण व्यावसायिक नऱ्हे परिसरात राहायला आहे. फिर्यादी व्यावसायिक तरुणाच्या पत्नीला व्यवसायासाठी सात कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. सनदी लेखापाल गावडे याच्याशी व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीचा परिचय होता. गावडेने त्यांना सात कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी काही पैसे भरावे लागतील, असे त्याने सांगितले. गावडे याने एका पतसंस्थेकडून कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगितले होते.

गावडेचे पुणे-सातारा रस्त्यावर कार्यालय आहे. गावडे याच्या खात्यावर काही रक्कम व्यावसायिक दाम्पत्याने जमा केली, तसेच त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीकडून गावडे आणि साथीदारांनी कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने वेळोवेळी ८९ लाख १३ हजार रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर कर्ज मंजूर करुन दिले नाही. कर्ज न दिल्याने व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीने विचारणा केली. तेव्हा गावडे आणि साथीदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गावडे याच्या कार्यालयातील महिलेसह चाैघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे, अशी माहिती पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×