भक्ताचे पुष्प वर्षाव करून स्वागत
marathinews24.com
बीड – (अनंत जाधव) : जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कुशल नेतृत्वात पाथरी ते दक्षिणपीठ नाणिजधाम पायीदिंडीचे आयोजन करण्यात येते प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही स्वागताचे आयोजन दिनांक 2 गुरुवार रोजी केज ऑक्टोबर रोजी केज तालुक्यातील भक्तांकडून करण्यात आले होते. यावेळी बीड जिल्हाचे खासदार बजरंग सोनवणे, हारूणभाई इनामदार, स्वामी फक्त गणेश नांदे , पत्रकार सतीश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बजरंग सोनवणे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिकेच्या शाळा आदर्श होण्यासाठी प्रयत्न करा-लक्ष्मीकांत देशमुख – सविस्तर बातमी
दक्षिण पीठ यांच्या नियोजना नुसार यामध्ये जगदगुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम चे बारा उपपीठ सहभागी झाले आहे. या पैकी नागपूर, तेलंगाना, परभणी, नाशिक, मुंबई, पुणे, गोवा या सात उपपीठ वरून मुख्यपीठ नाणीजधाम पर्यंत वसुंधरा पायी दिंडीचे दर वर्षी आयोजन करण्यात येते. या पायी दिंडीत जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे हजारो अनुयायी ज्यांना दिंडी यांत्रिकी म्हटले जाते ते हजारो किलोमीटर पायी प्रवास करून दिनांक २१ ऑक्टोबर रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सव साठी श्री क्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार आहे.
हि दिंडी ग्लोबल वार्मिंग चे धोके काय आहे? पर्यावरणाचा समतोल कसा राखावा, निसर्गाचे रक्षण करावे, पृथ्वी रक्षण करावे, प्लास्टिक वापर करू नका, झाडे लावा झाडे वाचवा, झाडे तोडू नका, प्रदूषण टाळा, नदी नाले स्वच्छ ठेवा, परिसरात स्वच्छता राखा, असे संदेश देणारे फलक हातात घेऊन चालणारे युवायुवती या पायी दिंडी मध्ये जनजागृती करत आहेत, त्याच प्रमाणे युवायुवती ग्लोबल वार्मिंग चे पथनाट्य सादर करत जनजागृती करत आहेत. यामुळे नागरिकांना स्वच्छतेचा आगळावेगळा संदेश या पोहोचणार ही दिंडी महाराष्टातील बहुतांश भागातून हजारो गावातून, अनेक तालुक्यांतून / जिल्ह्यांतून जात आहे या प्रवासा दरम्यान जेथे दिंडी दिवसात चार वेळा नाश्ता व जेवण करण्यासाठी थांबते त्या ठिकाणी प्रतिष्ठीत मान्यवर यांच्या हस्ते हजारो झाडाचे वृक्षारोपण करण्यात येत आहे.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सूक्ष्म नियोजन नुसार या पायी चालणाऱ्या यात्रिकीना पर्यावरण संदेश देणारे विशेष गणवेश देण्यात आले आहे. यांच्यासाठी सात्विक व पौष्टिक भोजन व्यवस्था करणारी भोजन व्हॅन सोबत आहे. भोजन आणि नाश्ता दर दिवसांनुसार मेनू निश्चित आहे. स्वच्छ फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सोबत ठेवली आहे.
मलमूत्र विसर्जन साठी तसेच उघड्यावर कोणी जाऊ नये म्हणून टायलेट व्हॅन सोबत आहे, आरोग्याच्या दुष्टीने डॉक्टर यांचे पथक, औषधे व रुग्णवाहिका दिंडीत पूर्ण वेळ सोबत आहे. दिवसात फक्त २५ कि. मी. प्रवास करून मुक्कामाची जागोजागी व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो कि.मी. अंतर पायी प्रवास करण्यासाठी लयबद्ध धुनवर आध्यात्मिक वातावरणात नाणीजधाम येथे जात आहेत. या दिंडीची विशेष दिनचर्या ठरली आहे. वरील प्रमाणे सर्व व्यवस्था यात्रिकीसाठी मोफत असून सर्व खर्च रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम च्या वतीने करण्यात येत आहे.






















