Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

सनदी लेखापालाच्या कार्यालयात चोरी करणारे गजाआड

गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त

साडेआठ हजारांची रोकड आणि चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल केला जप्त 

marathinews24.com

पुणे – सनदी लेखापालाच्या कार्यालयात चोरी करुन पसार झालेल्या चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून साडेआठ हजारांची रोकड आणि चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निखील विजय पवार (वय १९), अनुराग विजय पवार (वय २१, रा. सरगम चाळ, बिबवेवाडी-गंगाधाम रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी सख्खे भाऊ आहेत.

मिठाई दुकानाचे शटर उचकटले, ३५ हजारांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी 

गुलटेकडीतील गिरीधर भवन चाैकातील एका सनदी लेखापालाच्या कार्यालयात १९ सप्टेंबरला मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी कार्यालयाचे दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. कप्प्यातील रोकड, चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल चोरून दोघे जण पसार झाले. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या भागतीलल सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते. गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी अमोल रसाळ, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय जाधव यांना सराइत चोरटे पवार यांनी सनदी लेखापालाच्या कार्यालयात चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक रसाळ, आशिष कवठेकर, पोलीस कर्मचारी जाधव, नेवसे, पवार, टकले, चव्हाण, सरडे, आबनावे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×