ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची ५ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी मारला डल्ला 

marathinews24.com

पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ५ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चाेरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कात्रज भागातील आंबेगाव परिसरात राहायला आहेत.

सहकारनगर भागातील बंगल्यात चंदनाची चोरी – सविस्तर बातमी 

सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांनी सुरुवातीला त्यांना ऑनलाइन पद्धतीने एक काम करण्यास दिले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला काही रक्कम महिलेच्या खात्यावर जमा केली. परताव्यापोटी काही रक्कम मिळाल्यानंतर महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ५ लाख १५ हजार रुपये वेळोवेळी जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×