Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

डॉ. सलमा खान यांना राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे डॉ. सलमा खान यांचा गौरव

marathinews24.com

मुंबई – तृतीयपंथी समुदायाच्या राष्ट्रीय नेत्या आणि किन्नर मॉं संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सलमा खान यांना ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित ‘ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

रसिकांसाठी ‘स्वरयज्ञ’ ठरली सांगीतिक पर्वणी – सविस्तर बातमी

कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे आणि वस्तू व सेवा कर विभागाचे विशेष आयुक्त नितीन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सन्मानाने तृतीयपंथी समुदायाच्या कार्यकर्त्यांच्या समाजातील योगदानाची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली आहे. सन्मान सोहळ्यात राज्यातील विविध भागांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये कोल्हापूर येथील सुशीला ओडेयर, सांगली येथील चेलनादेवी खुरपे, पुणे येथील अरुण रोडे, छत्रपती संभाजीनगर येथील रमेश दुसे, चंद्रपूर येथील श्रीराम पान्हेरकर आणि मुंबई येथील डॉ. सलमा खान यांचा समावेश होता.

लातूर ज्येष्ठ नागरिक संघास राज्यस्तरीय संघ सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रमोद ढोकले, प्रास्ताविक दत्ता बाळसराफ यांनी केले, तर दीपिका शेरखाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×