Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

जत मध्ये नगराध्यक्ष पद खुले; राजकीय आखाडा तापणार

जत मध्ये नगराध्यक्ष पद खुले; राजकीय आखाडा तापणार

नगरपरिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच नगराध्यक्ष पद खुले

marathinews24.com

सांगली(रेवण कोळेकर) : जत नगर परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे खुले झाले आहे. यामुळे राजकीय आखाडा जोरात तापण्याची शक्यता आहे. आजपर्यंत नगरपरिषद निवडणुकीत किंगमेकर ची भूमिका बजावणारे नेते यावेळेस स्वतः किंग बनण्यासाठी नगरपरिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित मानले जात आहे.

राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर – सविस्तर बातमी 

राज्यातील नगरपंचायती व नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत निघाली असून, जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद खुले झाल्याने आगामी निवडणुकीत मोठी रंगत व चुरस पाहावयास मिळणार आहे. जत नगरपरिषद निवडणुकीत आतापर्यंत ‘सुरेश शिंदे’ गटाला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. नगरपरिषद स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पर हे अनुसूचित जातीसाठी राखीव होते, या निवडणुकीत सुरेश शिंदे गटाचे रवींद्र साळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले. यावेळी सुरेश शिंदे व माझे आमदार विक्रम सिंह सावंत गटाच्या शुभांगी बन्नेनवर या नगराध्यक्षपदी निवडून आल्या.

आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद खुले झाल्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवर यांचे पती अशोक बन्नेनवर, भाजपकडून केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक स्त्री रोग तज्ञ डॉ. रवींद्र आरळी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, विक्रम ताड या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षातर्फे नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी जोरदार असल्याची चर्चा आहे.

आज वरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुरेश शिंदे यांनी नेहमीच ‘किंगमेकर’ ची भूमिका पार पाडली होती, परंतु आता नगराध्यक्ष पद खुले झाल्याने सुरेश शिंदे स्वतः किंग बनण्यासाठी आखाड्यात उतरणार का, याकडेही सर्व नागरिकांचे व नेतेमंडळींचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×