Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

जुन्या भांडणातून दोन्ही कुटूंबियांनी केली एकमेकांना मारहाण

नोकरानेच मारला डल्ला, ७ लाखांचा ऐवज चोरला

वानवडीत परस्परविरोधी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – किरकोळ जुन्या वादातून टोळक्याने एकमेकांच्या घरात शिरून तरूणासह त्यांच्या कुटूंबियांना बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे. दोन्ही हल्ल्यात टोळक्याने घातक शस्त्रासह दगडांनी हल्ला करीत संबंधितांना जखमी केल्याची घटना ५ ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास हडपसरमधील गोसावी वस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंतवणूकीच्या आमिष पडले ३७ लाखांना – सविस्तर बातमी 

सागर शंकर शेगर, राहूल अर्जुन शेगर, किशोर शंकर शेगर, शत्रुघ्न अर्जुन शेगर, मनोज अर्जुन शेगर, स्वप्नील अर्जुन शेगर, नितीन सुभाष शेगर, ज्योती शेगर, संगीता शेगर, हिरकणबाई शेगर (सर्व रा. गोसावी वस्ती हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक बाबाजी शेगर (वय २३) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून शेगर कुटूंबियामध्ये वाद आहेत. ५ ऑक्टोबारला सकाळी साडेदहाच्या सुमारास टोळक्याने दीपक शेगर यांच्या घरात शिरून त्यांच्या डोक्यात शस्त्राने मारहाण केली. त्यांच्या कुटूंबियावर हल्ला करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोके तपास करीत आहते. तर दुसरे तक्रारदार राहूल अर्जुन शेगर (वय ३२, रा. गोसावी वस्ती, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाबाजी शेगर, दीपक बाबाजी शेगर, प्रेम बाबाजी शेगर, करण बाबाजी शेगर, रोहन बाबाजी शिंदे यांच्यासह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहूल शेगर गंभीर जखमी झाले आहे. त्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×