सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पाषाण भागातील व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी १ कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्यााचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत व्यावसायिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लासच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक पाषाण भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी मे महिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकाव संदेश पाठविला होता. शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक काम करणाऱ्या संस्थेतील प्रतिनिधी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी व्यावसायिकाला दाखविले होते. व्यावसायिकाला समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करून घेतले. गुंतवणूक विषयक योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. व्यावसायिकाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांच्या खात्यात परताव्यापोटी दिली जाणारी रक्कम जमा केली नव्हती. परतावा मिळाल्याने व्यावसायिकाने आणखी रक्कम गुंतविली. गेल्या चार महिन्यात सायबर चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी १ कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा केले.
पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. पैसे परत करण्याबाबत त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्याात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक देवकाते तपास करत आहेत.





















