क्लासच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य

क्लासच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य

क्लास चालक गजाआड

marathinews24.com

पुणे – विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. सुरेश दौलत रौंदळ (वय ४६, रा. गौरव राज बिल्डींग, दत्तनगर, आांबेगाव, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे.याबाबत अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

युवतीला धमकाविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी रौंदळ याच्याकडे शिकवणीला यायची. स्वारगेट भागात आरोपी रौंदळ खासगी शिकवणी चालवितो. गुरुवारी (९ ऑक्टोबर) सकाळी पावणे आठच्या सुमारास मुलगी शिकवणी वर्गात एकटीच होती. त्यावेळी आरोपी रौंदळ याने मुलीशी संवाद साधला. ‘तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला आवडते. मी शाळा सुरू करणार आहे. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देणार आहे, तसेच तुला मी सोन्याची रिंग देणार आहे’, असे सांगून रौंदळने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबबातची माहिती कुटुंबीयांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

आरोपी रौंदळ याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×